भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आज आपला ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा घनिष्ठ आणि बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकरने त्याला या खास दिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले. एक फोटो बालपणीचा असून दुसरा क्रिकेटमधील निवृत्तीनंतरचा आहे. ”वाढदिवसाच्या शुभेच्छा कांबळ्या! मैदानावर आणि मैदानाबाहेर असलेल्या आपल्या असंख्य आठवणी मी कायम जपत राहीन. देव तुला आशीर्वाद देवो”, असे सचिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

भारताकडून विनोद कांबळीने १७ कसोटी आणि १०४ वनडे सामने खेळले. कांबळीचा जन्म मुंबईत एका सामान्य कुटुंबात झाला. शालेय क्रिकेट खेळताना विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांनी ६६४ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. शारदाश्रमने त्या सामन्यात २ बाद ७४८ धावा ठोकल्या. विनोद कांबळी ३४९ धावांवर नाबाद होता. याच सामन्यात कांबळीने ३७ धावात ६ विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाला गारद केले होते.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Match Highlights in Marathi
IPL 2024 RCB vs SRH : धावांचा महापूर सुफळ संपूर्ण; दिनेश कार्तिकची झुंज व्यर्थ
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Noida women in viral Holi video
होळीच्या नावावर मेट्रो अन् चालत्या स्कुटीवर अश्लील स्टंट करणाऱ्या कोण आहेत विनीता आणि प्रीती? पोलिसांनी केली अटक

हेही वाचा – ‘‘माझ्या मते हे…”, विराटनं कसोटीचं कर्णधारपद सोडल्यानंतर पाकिस्तानच्या आफ्रिदीनं दिली मोठी प्रतिक्रिया!

विनोद कांबळीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सचिनसारखी यशस्वी ठरली नाही. सचिन आणि कांबळी हे दोघेही रमाकांत आचरेकरांचे शिष्य. १९८९ साली गुजरात विरुद्धच्या सामन्यात कांबळीने षटकारर ठोकून रणजीमध्ये पदार्पण केले. १९९६च्या वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंके विरुद्ध भारताचा उपांत्य फेरीचा सामना सुरु होता. अचानक भारताचा डाव गडगडला. त्यावेळी कांबळी ड्रेसिंग रुममध्ये रडत जाताना दिसला. याच सामन्यानंतर कांबळीची कारकीर्द घसरली.