उदयोन्मुख खेळाडू पी. व्ही. सिंधूला अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच्या लढतीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. सायना नेहवालने विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली, मात्र पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत यांच्यासह ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा यांनाही गाशा गुंडाळावा लागला. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या सिंधूला अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची पदार्पणवारी निराशाजनकच ठरली. चीनच्या सन युने सिंधूवर २१-१६, २१-१५ अशी मात केली. सनविरुद्ध सिंधूची कामगिरी २-१ अशी होती मात्र या लढतीत सनच्या शैलीदार खेळासमोर सिंधूचा निभाव लागला नाही. बुधवारी रात्री झालेल्या लढतीत सायनाने स्कॉटलंड किरस्ती गिलमूरवर २१-१५, २१-६ असा सहज मिळवला. दमदार स्मॅॅशेस, नेटजवळून केलेला सुरेख खेळ हे सायनाच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
अखिल इंग्लंड बॅडमिंटन : सिंधूचे आव्हान संपुष्टात
उदयोन्मुख खेळाडू पी. व्ही. सिंधूला अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच्या लढतीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

First published on: 07-03-2014 at 05:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal advances pv sindhu exits all england championship