भारताची फुलराणी सायना नेहवालने स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. दुखापतीमुळे यंदाच्या वर्षांतील बहुतांशी स्पर्धामधून सायनाने माघार घेतली होती. दुखापतीतून सावरल्यानंतर सायना ऑल इंग्लंड स्पर्धेत सहभागी झाली, मात्र उपांत्यपूर्व फेरीतच तिला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवातून बोध घेत सायनाने स्विस खुल्या स्पर्धेत दमदार सुरुवात केली. अव्वल मानांकित सायनाने जर्मनीच्या करिन श्नासवर २१-७, २१-१५ असा विजय मिळवला.
अन्य लढतीत बी. साईप्रणीतने उझबेकिस्तानच्या आर्टयोम सॅव्हातिग्युनवर २१-१४, १३-२१, २१-६ अशी मात केली. अकराव्या मानांकित अजय जयरामने मलेशिया जिआन शिआरंग चिआंगचा २१-८, २१-१७ असा धुव्वा उडवला. १३ व्या मानांकित एच.एस. प्रणॉयने फिनलंडच्या काले कोलिजनवर २१-१९, २१-१९ अशी मात केली. समीर वर्माने डेन्मार्कच्या एमिल होल्स्टला २१-१७, २४-२२ असे नमवले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2016 रोजी प्रकाशित
स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा : सायनाची विजयी सलामी
भारताची फुलराणी सायना नेहवालने स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

First published on: 17-03-2016 at 02:36 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal reach in pre quarterfinals of swiss open