विश्व अजिंक्यपद स्पर्धेनंतर गेल्या आठवडय़ाभरापासून भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल माजी राष्ट्रीय प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. त्यांचे मार्गदर्शन स्पर्धेच्या वेळीही मिळायला हवे, यासाठी विमल कुमार इन्चॉनमध्येही हवेत, अशी मागणी सायनाने केली आहे.
‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कोरिआला जाणाऱ्या प्रशिक्षकांच्या यादीमध्ये विमल कुमार यांचेही नाव असावे, अशी मागणी सायनाने बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाला (बाइ) केली आहे. आम्ही ही सायनाची मागणी अधिकारी वर्गाला पाठवली असून त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहात आहोत,’’ असे ‘बाइ’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
‘‘आशियाई स्पर्धेला जाणाऱ्या बॅडमिंटन चमूबरोबर पुलेला गोपीचंद, मधुमिता बिश्त आणि विजयदीप सिंग हे तीन प्रशिक्षक पाठविण्यात येणार होते. पण आता विमल कुमार यांचे नाव यादीमध्ये घ्यावे लागेल. पण जर अतिरिक्त प्रशिक्षक गेल्यास त्याचा फायदा भारतीय चमूला नक्कीच होईल,’’ असेही त्यांना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2014 रोजी प्रकाशित
विमल कुमारांचे मार्गदर्शन इन्चॉनमध्ये हवे -सायना
विश्व अजिंक्यपद स्पर्धेनंतर गेल्या आठवडय़ाभरापासून भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल माजी राष्ट्रीय प्रशिक्षक विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.

First published on: 11-09-2014 at 01:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal wants vimal kumar as coach for asian games