अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीचे माद्रिद खुल्या टेनिस स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मिर्झा-हिंगिस जोडीने बेथानी मॅटेक-सॅण्ड्स आणि ल्युसी साफारोव्हा जोडीकडून ७-६ (५), ३-६, ९-११ अशा फरकाने हार पत्करली.
सलग दुसऱ्या पराभवामुळे भारत-स्वित्र्झलडच्या या जोडगोळीचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान खालसा झाले आहे. सॅण्ड्स-साफारोव्हा जोडीने ते आता काबीज केले आहे.
लिएण्डर पेस व डॅनियल नेस्टर या जोडीचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले आहे. त्यांनी ६-७ (४), ३-६ अशी फलिसिआनो लोपेझ आणि मॅक्स मिर्नी यांच्याकडून हार पत्करली. तथापि, रोहन बोपण्णाने फ्लोरिन मेर्गीआसोबत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बोपण्णा-मेर्गिआ जोडीने एडुअर्ड रॉजर-व्हॅसेलिन आणि निकोलस माहूत जोडीला ६-४, ४-६, १०-५ असे पराभूत केले.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2015 रोजी प्रकाशित
सानिया, पेस पराभूत; बोपण्णा उपांत्यपूर्व फेरीत
अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीचे माद्रिद खुल्या टेनिस स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
First published on: 09-05-2015 at 04:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza