ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुहेरी महिला गटात उपांत्यपूर्व फेरीपर्यंतची सानिया-कॅरा जोडीची विजयी घौडदौड संपुष्टात आली आहे. सानिया मिर्झा आणि कॅरा ब्लॅक जोडीला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इर्रानी आणि विंसी जोडीसमोर २-६, ६-३, ४-६ ने परभवाला समोरे जावे लागले आहे.
सामन्यात एका वेळी सानिया-कॅरा जोडी ४-१ ने आघाडीवर होती. त्यावेळी सानिया-कॅराच हा सामना जिंकून उपांत्यफेरीत प्रवेश करतीय अशी चिन्हे होती. परंतु, पुढील सर्व सेट मध्ये इर्ऱानी-विंसी जोडीने दमदार पुनरागमन केले आणि आघाडी प्राप्त केली व ती सामन्याच्या अखेर पर्यंत कायम राखली. सामना अतिशय रंगतदार झाला होता. तब्बल १ तास ४८ मिनिटे हा सामना रंगला होता. उपांत्यपूर्व फेरीत पोहचेपर्यंतची सानिया-कॅराची विजयी कामगिरी पाहता हाही सामना सानिया-कॅरा जोडी आरामात जिंकून उपांत्यफेरीत प्रवेश करेल अशी आशा होती. परंतु, सामन्यात इर्रानी-विंसी जोडीचे पारडे जड ठरले आणि त्यांनी उपांत्यफेरीत प्रवेश केला.