भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस जोडीने महिला दुहेरीतील आपला दबदबा कायम राखत डब्ल्यूटीए स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले आहे.
महिला दुहेरीत अव्वल स्थानावर असलेल्या मिर्झा-हिंगिस जोडीने डब्ल्यूटीए स्पर्धेत अंतिम फेरीत स्पेनच्या गार्बिनी मुगुरुझा आणि कार्ला सुआरेझ जोडीचा ६-०,६-३ अशा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. या विजयासह सानिया-मार्टिनाने सलग २२ सामने जिंकण्याचा नवा विक्रम देखील प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत या अव्वल मानांकित जोडीने एकही सेट गमावलेला नाही. दिग्गद टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हाच्या हस्ते सानिया-हिंगिस जोडीला डब्ल्यूटीए स्पर्धेच्या विजेतेपदाचे मानचिन्ह प्रदान करण्यात आले. ‘डब्ल्यूटीए’ स्पर्धेचे विजेतेपद हे सानियाचे यंदाच्या मोसमातले दहावे आणि मार्टिनासोबतचे नववे विजेतेपद ठरले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2015 रोजी प्रकाशित
महिला दुहेरी सानिया-मार्टिनाचा दबदबा, ‘डब्ल्यूटीए’चे जेतेपद
सानिया-मार्टिनाने सलग २२ सामने जिंकण्याचा नवा विक्रम देखील प्रस्थापित केला आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 01-11-2015 at 17:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza martina hingis dream run continues bag ninth title of the year