भारताचा अष्टपैलू खेळाडू संजय बांगरने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालविरुद्ध रेल्वेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर बांगरने निवृत्तीची घोषणा केली.रेल्वेचा संघ बादफेरीसाठी पात्र ठरेल अशी मला आशा होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे निवृत्त होण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे मला वाटले असे बांगरने सांगितले. बांगरने १२ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रेल्वेचा आधारस्तंभ असलेल्या बांगरच्या नावावर १६५ प्रथम श्रेणी सामन्यांत ३३.३५च्या सरासरीने ८३४२ धावांसह ३०० बळींची नोंद आहे.