जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं. पुनर्विकसित करण्यात आलेल्या या मैदानावर कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळण्यात येणार आहेत. तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात होणाऱ्या गुलाबी चेंडूने खेळण्यात येत आहे. सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव असलेल्या स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम केल्याने नेटीझन्स प्रचंड संतापले. हे स्टेडियम अभिमानास्पद आहे पण नाव बदलणं ही बाब शरमेची आहे, अशा भावना ट्विटरवर उमटल्या. Hye Engineers! Is this possible?#सरदार_पटेल_का_अपमान #सरदार_पटेल_स्टेडियम #नरेंद्र_मोदी_स्टेडियम pic.twitter.com/T8H7V49HZN — AMARJEET (@Amarjeetammy27) February 24, 2021 - The two bowling ends of Narendra Modi Stadium is- 1. Adani End 2. Reliance End Hens it's proved that "Hum do hmare do" Ki sarkar. #MoteraCricketStadium#सरदार_पटेल_का_अपमान pic.twitter.com/kiEZBLzB6w — Ugarsen Sahu (@sahu_choudhary) February 24, 2021 - This is very bad . This is really very bad. #सरदार_पटेल_का_अपमान#sardarpatelstadium #speakupeveryone#सरदार_पटेल_का_अपमान pic.twitter.com/oSPVVzAwSS — Aditya Gujjar (@iAddyGurjar) February 24, 2021 - Sardar Patel stadium renamed as Narendra Modi stadium! This government is as ugly as it can get! #सरदार_पटेल_का_अपमान #सरदार_पटेल_स्टेडियम — Geetika (@methedivinity) February 24, 2021 - Sardar Patel stadium in Ahmedabad is renamed as #NarendraModiCricketStadium RSS is taking revenge on Sardar Patel for banning RSS.#MoteraCricketStadium#सरदार_पटेल_का_अपमान pic.twitter.com/LdoKtI0FaS — SUSHILABEN SOLANKI (@babusinhsolank2) February 24, 2021 - Wow.. World's largest cricket stadium was named after the world's best spinner of jumlebaj, It is totally insult to our late sardar Vallabhbhai Patel ji.#मोदी_मतलब_देश_चौपट#ModiDontSellFarmers#सरदार_पटेल_का_अपमान pic.twitter.com/L1z0jO43NH — Vicky Singh (@singhvicky_123) February 24, 2021 - Shame on Modi and shame on supporters of Modi #सरदार_पटेल_का_अपमान pic.twitter.com/LrvTG0Gwyj — Ugarsen Sahu (@sahu_choudhary) February 24, 2021 - Modi Govt. mean "Name Changer Govt. But every indian is not accept#सरदार_पटेल_का_अपमान pic.twitter.com/9TvPwN3LjK — Ugarsen Sahu (@sahu_choudhary) February 24, 2021 - #सरदार_पटेल_का_अपमान Stadium name should be in the name of our country's sports icons#MoteraCricketStadium — SUSHILABEN SOLANKI (@babusinhsolank2) February 24, 2021 उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्टेडियमचं वेगळेपण अधोरेखित केलं. त्याचबरोबर हे नरेंद्र मोदींचं स्वप्न होतं, जे आज पूर्ण झालं आहे, असं शाह यांनी सांगितलं. “गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी अशा प्रकारच्या स्टेडियमचं स्वप्न बघितलं होतं, जे आज पूर्ण झालं आहे. या नवं स्टेडियम जगातील सर्वात मोठं आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या स्टेडियमच्या आधारवर विकसित करण्यात आलेलं आहे. मोदी यांच्यासोबत खुप वर्षांपासून काम करत आहे. त्यांनी तरुणांना नेहमीच खेळासाठी प्रोत्साहित केलं आहे,” असं शाह यांनी यावेळी सांगितलं.