रेड बुलचा ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेलने सिंगापूर ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत जेतेपदावर नाव कोरले. या विजेतेपदासह वेटेलने सलग चौथ्यांदा विश्वविजेतेपद पटकावण्याच्या दिशेने कूच केली आहे. ड्रायव्हर्स अजिंक्यपद शर्यतीत वेटेल २४७ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्याखालोखाल फेरारीचा फर्नाडो अलोन्सो दुसऱ्या स्थानी आहे. वेटेलने अलोन्सो आणि लोटसचा किमी रायकोनेन यांना मागे टाकून सिंगापूर शर्यतीत बाजी मारली. अलोन्सोने दुसरे तर रायकोनेनने तिसरे स्थान प्राप्त केले. मर्सिडिझच्या निको रोसबर्ग आणि लुइस हॅमिल्टन यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळवले. फेरारीचा फेलिपे मासा सहावा आला. मॅकलॅरेनच्या जेन्सन बटन आणि सर्जीओ पेरेझ यांना सातव्या आणि आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. फोर्स इंडियाच्या एड्रियन सुटीलने दहाव्या स्थानी मजल मारली. त्याचा सहकारी पॉल डी रेस्टा याला शर्यत पूर्ण करता आली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebastian vettel extends title lead at singapore grand prix
First published on: 23-09-2013 at 02:51 IST