नेमांजा मॅक्सिमोव्हिकने अतिरिक्त वेळातील खेळात ११८वा गोल साकारला आणि सर्बियाने बलाढय़ ब्राझीलला हरवून २० वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे विजेतेपद पटकावले.
नॉर्थ हार्बर स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या लढतीत ९० मिनिटांचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. प्रारंभीपासून हल्ला-प्रतिहल्ला यांचे नाटय़ सामन्यातील चुरस वाढवणारे ठरले. स्टानिसा मँडिकने ७०व्या मिनिटाला गोल साकारून स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आलेल्या सर्बियाच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या आशा निर्माण केल्या. परंतु तीनच मिनिटांत आंद्रेस परेराने ब्राझीलला बरोबरी साधून दिली.
ब्राझीलने पहिल्या सत्रावर वर्चस्व प्रस्थापित केले. जीन कार्लोस आणि गॅब्रिएल यांनी गोल साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण सर्बियाचा कर्णधार प्र्रेडॅग राजकोव्हिकने ते वाचवले. अतिरिक्त वेळात सर्बियाचा मध्यरक्षक सर्गेज मिलानकोव्हिकने दुसऱ्याच मिनिटाला हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र जीनने तो हाणून पाडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serbia crowned world under 20 champions after beating brazil in final
First published on: 21-06-2015 at 12:04 IST