Pakistan Team Dressing room verbal fight: आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर फोर फेरीतील श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघ बाहेर पडल. या सामन्यात पाकिस्तान अवघ्या दोन धावांनी पराभूत व्हावे लागले. ज्यामुळे श्रीलंकेचा संघ फायनलमध्ये पोहोचला, तर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला. त्यामुळे पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आपल्या खेळाडूंवर संतापला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तान संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

कर्णधार बाबर आझमने सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये सांघिक बैठक घेतली. त्यानंतर या बैठकीत खेळाडूंना चांगलेच खडसावले. दरम्यान वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी बैठकीत बोलताच, त्याला ही बाबरने फटकारले. यानंतर यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने हा वाद थांबवला.
त्यामुळे या पराभवानंतर एकीकडे पाकिस्तान क्रिकेट संघाचा आशिया चषक स्पर्धेतील प्रवास संपला, तर दुसरीकडे श्रीलंकेला अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यात यश आले. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पाकिस्ताननेही सुपर फोरच्या गुणतालिकेत शेवटचे स्थान पटकावले आहे. तसेच संघाच्या कामगिरीने निराश झालेल्या बाबरने खेळाडूंना जास्त सुपरस्टार बनू नका, असे सुनावले आहे.

How Chennai Super Kings Qualify for Playoffs
IPL 2024: चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये जाणार? पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर ही आहेत समीकरणं
Gautam Gambhir Argument With Umpire
KKR vs PBKS : पंजाबविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीर संतापला, लाइव्ह मॅचदरम्यान अंपायरशी भिडला, VIDEO व्हायरल
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात

हेही वाचा – World Cup 2023: ‘कोई भी आए, देख लेंगे…’; एकदिवसीय विश्वचषकापूर्वी सुरेश रैनाने विरोधी संघांना दिला इशारा

बाबर आझमने पाकिस्तान संघाची घेतली शाळा –

बोलन्यूजमधील एका बातमीनुसार बाबर आझम पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीवर अजिबात खूश नाही. श्रीलंकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर बाबरने सांघिक बैठकीत सांगितले की, खेळाडू पूर्ण जबाबदारीने खेळले नाहीत. त्याचबरोबर या बैठकीत वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने म्हणाला की, ज्या खेळाडूंनी चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी केली किमान त्यांना तरी प्रोत्साहन द्या. यावर बाबर आझम शाहीनला पलटवार करताना म्हणाला की, मला माहित आहे की कोण चमकदार कामगिरी करत आहे. यानंतर यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने हा वाद थांबवला. बाबरने जास्त सुपरस्टार बनू नका असेही म्हटले आहे. वर्ल्डकपमध्येही अशीच कामगिरी राहिली तर, कोणीही सुपरस्टार म्हणणार नाही.