कराची : माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीची शनिवारी पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) सर्व समिती रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर चोवीस तासांत नव्या अंतरिम निवड समितीची घोषणा केली. आफ्रिदीच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये माजी खेळाडू अब्दुल रझाक, राव इफ्तिकार अहमद आणि हरुन रशिद यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीवर सध्या केवळ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना सोमवारपासून(२६ डिसेंबर) खेळला जाईल.धाडसी निर्णय घेण्याची आमची तयारी आहे, पण असे निर्णयही धोरणात्मक असतील. मैदानावर दर्जेदार कामगिरी करून दाखवेल असा संघ आम्हाला तयार करायचा आहे. यासाठी मी लवकरच निवड समितीची बैठक बोलवेन आणि आगामी सामन्यांबाबत माझ्या योजना स्पष्ट करेन. – शाहीद आफ्रिदी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid afridi interim chairman of pakistan selection committee amy
First published on: 25-12-2022 at 02:44 IST