ढाका प्रीमियर लीग (डीपीएल २०२१) मध्ये गैरवर्तन केल्याबद्दल बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू शाकिब अल हसन चर्चेत आहे. एका सामन्यादरम्यान त्याने मैदानावरील स्टम्पला लाथ मारून पंचांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर सोशल मीडियावर शाकिबवर बरीच टीका झाली. या घटनेनंतर शाकिब त्याच्या वागण्याबद्दल खूपच निराश झाला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माफी मागितली आहे. शाकिबची पत्नी उम्मी अहमद शिशिरने या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उम्मी अहमद शिशिरने फेसबुकवर एक पोस्ट टाकून पती शाकिबचा बचाव केला आहे. ती म्हणाली, ”माझ्या नवऱ्याला असे कृत्य करण्यास भाग पाडले गेले आहे. शाकिबने मैदानावर जे काही केले, त्यामागे एखादे षडयंत्र रचले गेले असावे.”

हेही वाचा – कुस्तीपटू विनेश फोगटची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक!

”मी माध्यमांइतकेच या घटनेचा आनंद घेत आहे. अखेर टीव्हीवर बातमी आलीच. लोकांचा पाठिंबा पाहून बरे वाटले, ज्यांनी कमीतकमी एखाद्याच्या विरोधात उभे राहण्याचे धैर्य दाखवले. माध्यमांद्वारे खरी गोष्ट लपवली जात आहे, याची खंत वाटते. फक्त त्याचा राग दाखवला जात आहे. मुख्य मुद्दा पंचांचे निर्णय आहेत. मथळे खरोखर दुःख देणारे आहेत. माझ्या दृष्टीने हे त्याच्याविरूद्धचे षड्यंत्र आहे, जे काही काळ त्याला खलनायक म्हणून दर्शवत आहे. जर आपण क्रिकेटप्रेमी असाल, तर आपल्या कृतीत सावधगिरी बाळगा”, असे शाकिबच्या पत्नीने फेसबुक पोस्टद्वारे म्हटले.

हेही वाचा – ‘इंग्लंडमध्ये खेळतोयस तर ‘‘या” गोष्टीचा आदर कर’

 

नक्की प्रकरण काय?

बांगलादेशात सुरु असलेल्या ढाका प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला. मोहमद्दन स्पोर्टिंग क्लब आणि अबाहानी लिमिटेड या दोन संघादरम्यान सामना सुरु होता. मोहमद्दन स्पोर्टिंगचा खेळाडू असलेल्या शाकिब अल हसनने अबाहानी लिमिटेडच्या मुश्फिकुर रहीम याच्याविरोधात एलबीडब्लूचे अपील केले. त्यावर पंचांनी नॉट आऊटचा निर्णय घेतला. पंचांच्या या निर्णयावर शाकिबने त्यांच्याशी वाद घातला आणि स्टम्पवर लाथ मारली. त्यानंतर रागाच्या भरात शाकिबने तिनही स्टंप्स काढून टाकल्या आणि त्या पीचवर फेकल्या. शाकिबच्या कृतीमुळे आता सोशल मीडियामध्ये त्यावर टीका केली जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakib al hasans wife backs her husband over dpl 2021 controversy adn
First published on: 12-06-2021 at 16:59 IST