मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या पार्थिवावर येत्या दोन-तीन आठवडय़ांत मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून या वेळी एक लाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे.ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी वॉर्नचे व्यवस्थापक जेम्स एस्र्कीन यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. मात्र वॉर्नचे कर्तृत्व पाहता त्याच्यावर ‘एमसीजी’व्यतिरिक्त अन्य ठिकाणी अंत्यसंस्कार करणे उचित ठरणार नाही, असे संकेत त्यांनी दिले.

एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन किंवा तीन आठवडय़ांच्या कालावधीत वॉर्नवर ‘एमसीजी’ येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित असतील. थायलंडमधील कोह सामुई येथून वॉर्नचे पार्थिव अजून मेलबर्न येथे परतले नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी अंतिम संस्कारासाठी तारीख निश्चित केलेली नाही.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मेलबर्नमध्ये जन्मलेल्या वॉर्नचे ‘एमसीजी’ हे सर्वात आवडते मैदान होते. याच मैदानावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७०० बळींचा टप्पा गाठला होता. ‘एमसीजी’बाहेर वॉर्नचा पुतळा उभारण्यात आला असून लवकरच एका स्टॅण्डलाही त्याचे नाव देण्यात येणार आहे.

वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणांनीच

सोमवारी शवविच्छेदनानंतर वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणांनीच झाल्याचा निष्कर्ष थायलंड पोलिसांनी काढला आहे. राष्ट्रीय पोलिसांचे प्रवक्ते किस्साना पाथानाचारोन यांच्या निवेदनानुसार त्यांनी वॉर्नच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली.