Women’s T20 WC 2020 : स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. सलामीवीर एलिसा हेली (७५) आणि बेथ मूनी (७८*) यांच्या फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १८४ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली आणि विजेतेपदाची संधी गमावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

VIDEO : कौतुकास्पद! चिमुकल्या दिव्यांग चाहतीला दिलं विश्वविजेतेपदाचं सुवर्णपदक

या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की भारतीय महिला संघाला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला असला, तरी या स्पर्धेतील संघाची कामगिरी अप्रतिम होती. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी सर्वोत्तम खेळ केला. त्यामुळे महिला संघाचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ऑस्ट्रेलियन महिला संघाचेदेखील अभिनंदन. जेव्हा गरजेचे होते, तेव्हा मोक्याच्या सामन्यात त्यांनी सर्वोत्तम खेळ करून दाखवला आणि विश्वविजेतेपद मिळवले.

T20 World Cup : हृदयद्रावक! पराभवानंतर १६ वर्षीय शफालीला अश्रू अनावर

T20 World Cup : स्पर्धा गाजवणारी शफाली फायनलमध्ये अपयशी

भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दणदणीत पराभव

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात केली. क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सलामीवीर एलिसा हेलीने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली. त्यानंतर सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने जबाबदारीने खेळ केला. तिने नाबाद ७८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ ची धावसंख्या गाठून दिली. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अंतिम सामन्यात प्रचंड धावा खर्च केल्या.

T20 World Cup Final : हरमनप्रीतसाठी अंतिम सामना ‘ट्रिपल स्पेशल’, कारण…

या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती २ धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. आधीच्या षटकात २ चौकार लगावलेली स्मृती मानधना ११ धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर ४ धावांवर माघारी परतली. दिप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक ३३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल ६ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक ४ बळी टिपले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar praise team india women cricket team performance and congratulates australia for t20 world cup 2020 win vjb
First published on: 08-03-2020 at 17:40 IST