विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ लॉकडाउनपश्चात आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. २७ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून दोन्ही संघ या मालिकेत ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघाच्या किट स्पॉन्सर्समध्ये बदल करण्यात आले असून MPL हा ब्रँड पुढील ३ वर्षांसाठी टीम इंडियाचा किट स्पॉन्सर असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत टीम इंडिया रेट्रो जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. सलामीवीर शिखर धवनने या रेट्रो जर्सीचा फर्स्ट लुक रिव्हील केला आहे.

८० च्या दशकात टीम इंडियाचे खेळाडू ही जर्सी घालून मैदानावर उतरायचे. दरम्यान, यंदाच्या मालिकेत रोहित शर्माची संघात निवड न झाल्यामुळे शिखर धवनसमोर मोठं आव्हान असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan revels team india retro jersey look psd
First published on: 24-11-2020 at 14:58 IST