भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शिखर धवन याने मोठा खुलासा केला आहे. तो १४-१५ वर्षांचा असताना त्याने एचआयव्ही चाचणी केली होती, असं तो म्हणाला. तसेच त्यांनी यामागचं नेमकं कारणही सांगितलं आहे. नुकताच ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने यासंदर्भातील माहिती दिली.

हेही वाचा – मोठी बातमी! भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता

नेमकं काय म्हणाला शिखर धवन?

मी १४-१५ वर्षांचा असताना मित्राबरोबर मनालीला गेलो होते. त्यावेळी मी माझ्या पाठीवर एक टॅटू गोंदवून घेतला होता. मात्र, त्यानंतर मला भीती वाटायला लागली. कारण टॅटू बनवणाऱ्याने एकच सुई किती लोकांसाठी वापरली हे माहिती नव्हतं. त्यामुळे मनात शंका निर्माण झाली होती. शेवटी घाबरून मी थेट एचआयव्ही चाचणी करण्यासाठी पोहोचलो होतो. पण सुदैवाने ती चाचणी निगेटीव्ह आली, अशी प्रतिक्रिया शिखर धवनने दिली.

हेही वाचा – IPL 2023: स्टीव्ह स्मिथची आयपीएलमध्ये एन्ट्री! २०२२च्या लिलावात राहिला होता अनसोल्ड, आता ‘या’ संघात होणार सहभागी

वडिलांना पाठीवरचं टॅटू दिसला अन्…

टॅट्यू काढल्यानंतर जवळपास तीन ते चार महिने माझ्या घरी कोणालाही याची माहिती नव्हती. पण एकेदिवशी वडिलांना माझ्या पाठीवरचा टॅटू दिसला. त्यानंतर मला खूप बोलणे बसले. मला मारही बसला होता, असेही त्याने सांगितलं.

हेही वाचा – IPL 2023: ख्रिस गेलची कोहलीसोबत डान्स स्पर्धा ठेवली तर कोण जिंकणार? जाणून घ्या ‘युनिव्हर्स बॉस’ने काय दिले उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिखरने काढलेला पहिला टॅटू नेमका कोणता?

दरम्यान, यावेळी बोलताना त्याने पहिला टॅटू नेमका कोणता काढल याबाबतही माहिती दिली. मी माझा पाठीवर स्कॉर्पिओचा टॅटू काढला होता. मी काढलेला तो पहिला टॅटू होता. त्यानंतर मी भगवान शिव आणि अर्जुनाचाही टॅटू गोंदवून घेतला, असंही त्याने सांगितलं.