Shoaib Akhtar Becomes Father Third Time: शोएब अख्तर व त्याची पत्नी रुबाब खान यांनी शुक्रवारी आपल्याला कन्यारत्न प्राप्त झाल्याची माहिती देत एक खास इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. ४८ व्या वर्षी शोएब अख्तर तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. शोएब आणि रुबाब यांचे २०१४ मध्ये लग्न झाले होते व त्यांना मोहम्मद मिकाइल अली आणि मोहम्मद मुजद्दीद अली नावाचे दोन मुले आहेत. २०१६ व २०१९ मध्ये या मोहम्मद मिखाईल मिकाइल व मोहम्मद मुजद्दीद या दोघांचा जन्म झाला होता. तर आता लग्नाच्या १० वर्षांनी त्यांनी कुटुंबात तिसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. शोएबने आपल्या लेकीच्या जन्माची गोड बातमी देताना सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली असून यामध्ये बाळाचा चेहरा व नाव दोन्ही शेअर केले आहे.

शोएब अख्तरने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, “मिकेल आणि मुजद्दिदला आता एक लहान बहीण मिळाली आहे. अल्लाह तालाने आमच्या पदरात गोड मुलगी दिली आहे. 19 शाबान, 1445 एएच, जुम्माच्या नमाजच्या वेळी जन्मलेल्या नूरह अली अख्तरचे स्वागत. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोएब अख्तर हा पाकिस्तान क्रिकेट संघातील एक अत्यंत यशस्वी खेळाडू म्हणून ‘रावळपिंडी एक्सस्प्रेस’ या नावाने आजही प्रसिद्ध आहे. त्याने १९९७ मध्ये पाकिस्तानसाठी पदार्पण केले होते २०११ मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. या दरम्यान त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी २० मध्ये अनुक्रमे १७८, २४७ आणि १९ विकेट घेतल्या आहेत. सध्या शोएब अख्तर क्रिकेटच्या सामन्यांसाठी समालोचक म्हणून काम करत आहेच त्याशिवाय त्याने स्वतःच्या युट्युब चॅनेलवर सुद्धा सामन्यांनंतरचे विश्लेषण सांगणारी सीरीज सुरु केली आहे. UAE मध्ये ILT20 च्या सामन्यांसाठी त्याने शेवटचे समालोचक म्हणून काम केले होते.