भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने त्याच्या कारकिर्दीतील चौथ्याच टी२० सामन्यात मोठा विक्रम नोंदवला. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात एक चेंडू तब्बल १५५ किमी प्रतितास वेगाने टाकला. यामुळे तो भारताकडून सर्वाधिक वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला. त्याच्याआधी हा विक्रम जसप्रीत बुमराह याच्या नावावर होता. यावर पाकिस्तानचा रावळपिंडी एक्स्प्रेस अशी ओळख असणाऱ्या सोएब अख्तरने कौतुक केले आहे.

उमरान मलिकने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आपल्या वेगवान खेळीने पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही उमरानच्या वेगावर भाष्य केले आहे. उमरानने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात १५५ किमी प्रतितास वेगाने चेंडू दिला. उमरानने आपल्या तुफानी वेगवान चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाला तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यातील हा सर्वात वेगवान चेंडूही ठरला. यासह मलिकने भारतासाठी सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा जसप्रीत बुमराहचा विक्रमही मोडीत काढला आहे. बुमराहचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू ताशी १५३.३६ किलोमीटरचा आहे.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी

शोएब अख्तरने हे वक्तव्य केले आहे

स्पोर्ट्सकीडाशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला, ‘माझ्या विश्वविक्रमाला २० वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. उमरानने माझा विक्रम मोडला तर मला आनंद होईल. होय, पण माझा विक्रम मोडताना त्याने हाडे मोडू नयेत (हसून) हीच माझी प्रार्थना आहे. ते तंदुरुस्त असावे असे म्हणायचे आहे. रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएबने २००३ विश्वचषकादरम्यान इंग्लंडविरुद्ध १६१.३ किमी प्रतितास वेगाने त्याचा सर्वात वेगवान चेंडू टाकला होता.

हेही वाचा: ICC T20I Ranking: आयसीसी क्रमवारीत इशान किशनची मोठी झेप, तर दिपक हुडा पुन्हा टॉप १०० मध्ये दाखल

किलर गोलंदाजी तज्ञ

उमरान मलिक हा किलर बॉलिंगमध्ये निष्णात खेळाडू आहे. वेग ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. श्रीलंकेविरुद्ध १५५ किमी प्रति तास गोलंदाजी करून तो भारतासाठी सर्वात वेगवान गोलंदाज ठरला. यापूर्वी आयपीएलमध्ये त्याने १५७ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत उमरानने सर्वांना प्रभावित केले आहे. उमरान मलिक हा टी२० क्रिकेटचा महान मास्टर आहे. डावाच्या सुरुवातीला तो खूपच धोकादायक दिसतो. कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत ५ एकदिवसीय सामन्यात ७ बळी आणि ४ टी२० सामन्यात ४ बळी घेतले आहेत.

उमरानला जेव्हा तू अख्तरचा विक्रम मोडण्याबाबत प्रश्न विचारला होता, तेव्हा त्याने मी नशीबवान असेल तर मी नक्कीच हा विक्रम मोडेल. उमरान आयपीएलमध्ये प्रभावशाली गोलंदाजी करत चर्चेत आला होता. त्याचा वेग आधीपासूनच अधिक असून सध्या तो सरळ रेषेत गोलंदाजी करण्यावर भर देत आहे.

हेही वाचा: Asia Cup: टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? आशिया कपसाठी एकाच गटात समावेश, जय शाहांनी जाहीर केलं २०२३चे कॅलेंडर

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात उमरानने ४ षटके टाकताना २७ धावा देत २ बळी घेतले होते. या सामन्यात त्याने श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याला तो वेगवान चेंडू टाकला होता. त्यामध्ये सामन्याच्या १६.४ थ्या चेंडूवर शनाका चांगला शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता, मात्र युजवेंद्र चहल याने उत्तमरित्या तो झेल टिपला. शनाकाची विकेट भारतासाठी महत्वाची होती. तो २७ चेंडूत ४५ धावा करत बाद झाला.