Shubman Gill Wicket Ben Stokes Celebration Video Viral: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटीत भारताने चांगली सुरूवात झाली. बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. टीम इंडियाच्या सलामीवीरांनी पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता ७८ धावा केल्या. पण दुसऱ्या सत्रात मात्र संघाने ३ मोठया विकेट्स गमावल्या. यापैकी शुबमन गिलच्या विकेटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
शुबमन गिलने इंग्लंड दौऱ्यावरील आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने आतापर्यंत ६०० अधिक धावा केल्या आहेत. पण गिलला मैदानावर फार काळ टिकू न देण्यासाठी इंग्लंडने लॉर्ड्स आणि मँचेस्टर कसोटीत चांगले सापळे रचत बाद केलं आहे. मँचेस्टर कसोटीत गिल स्टोक्सच्या गोलंदाजीवर ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून सोशल मीडियावर त्याची हुर्यो उडवली जात आहे.
यशस्वी जैस्वाल अर्धशतक करून बाद झाल्यानंतर गिल फलंदाजीला आला. त्याने काही चांगले फटके खेळले, पण फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. स्टोक्सच्या ५०व्या षटकातील पहिलाच चेंडू खेळण्यासाठ गिल पुढे आला, पण चेंडू बाहेरच्या दिशेने जाईल असं वाटल्याने गिलने तो चेंडू सोडून दिला आणि पायचीत झाला.
स्टोक्सने टाकलेला चेंडू खरंतर सरळ ऑफ स्टम्पच्या दिशेने जात होता. पण शुबमन गिल चेंडू वाचण्यात अपयशी ठरला आणि त्याने पाय पुढे करत चेंडू सोडला. गिलच्या पॅडला चेंडू लागल्यानंतर स्टोक्स आणि संघाने विकेटसाठी अपील केलं. तितक्यात मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिलं. पण गिलने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये चेंडू थेट जाऊन ऑफ स्टम्पवर आदळला आणि तिसऱ्या पंचांनीही त्याला झेलबाद केलं.
शुबमन गिलच्या या विकेटनंतर त्याला चाहत्यांनी ट्रोल केलं आहे. पहिल्या दोन कसोटींनंतर शुबमन गिल लॉर्ड्स कसोटीतील दोन्ही डावात फेल ठरला. यानंतर आता मँचेस्टर कसोटीतही तो १२ धावांवर बाद झाला.