Bangladesh vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ३८व्या सामन्यात बांगलादेश आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा तीन विकेट राखून पराभव केला आहे. या पराभवासह श्रीलंकेचा संघ अधिकृतपणे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९.३ षटकात २७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने सात गडी गमावून २८२ धावा केल्या आणि सामना जिंकला.

बांगलादेश आणि इंग्लंड आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. आता श्रीलंकाही अधिकृतपणे अंतिम चारच्या शर्यतीतून बाहेर आहे. श्रीलंकेचा सध्याच्या स्पर्धेतील हा सहावा पराभव आहे. विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशने प्रथमच श्रीलंकेचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने ४९.३ षटकांत सर्व गडी गमावून २७९ धावा केल्या होत्या. चरित असलंकाने १०५ चेंडूत १०८ धावांची उत्कृष्ट शतकी खेळी केली. बांगलादेशकडून तनझिम हसनने गोलंदाजीत ३ बळी घेतले. तर शाकिब अल हसन आणि शोरीफुल इस्लाम यांना प्रत्येकी २ यश मिळाले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने ४१.१ षटकांत ७ गडी गमावून तीन विकेट्स राखून सामना जिंकला.

Nuwan Thushara Ruled Out from IND vs SL T20I Series
IND vs SL: श्रीलंकेला दुहेरी झटका, अवघ्या २४ तासांत सलग दुसरा खेळाडू भारताविरूद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर
Vikram Rathour on Shubman Gill
Shubman Gill : ‘एक दिवस शुबमन तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल…’, माजी बॅटिंग कोचचे मोठे वक्तव्य
Shreyanka Patil Finger Fractured
Team India : आशिया कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, ‘मॅच विनर’ खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
India beat Zimbabwe by 10 wickets
IND vs ZIM 4th T20 : शुबमनच्या नेतृत्वाखाली युवा ब्रिगेड मालिका जिंकण्यात ‘यशस्वी’, झिम्बाब्वेचा १० विकेट्सनी उडवला धुव्वा
Yuvraj Singh explosive batting 28 balls 59 runs
WLC 2024 : ५ षटकार… ४ चौकार, युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाला करुन दिली जुन्या दहशतीची आठवण
Taskin Ahmed was punished for sleeping
भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी झोपणं बांगलादेशच्या खेळाडूला पडलं महागात, संघाने दिली मोठी शिक्षा, आता मागतोय माफी
Rohit Sharma's Flying Kiss Video Viral After India's Defeat of England
IND vs ENG : आधी संघाला विजयी केले, मग जिंकले रितिकाचे मन, मैदानावर दिसले रोहित शर्माचे नवे रुप, पाहा VIDEO
Three important turning points in India's victory
IND vs ENG : रोहित-सूर्याची फलंदाजी, अक्षर-कुलदीपची फिरकी, ‘या’ तीन टर्निंग पॉइंट्समुळे भारताने इंग्लंडवर केली मात

हेही वाचा – SL vs BAN, World Cup 2023: अँजेलो मॅथ्यूज ‘Time Out’ झाल्यानंतर संतापला, रागाने हेल्मेट फेकल्याचा VIDEO व्हायरल

शाकिब आणि शांतोची दमदार फटकेबाजी –

बांगलादेशने २८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नझमुल हसन शांतोने ९० आणि शाकिब अल हसनने ८२ धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी मेहनत घेतली असली तरी मधल्या षटकांमध्ये शाकिब आणि शांतो यांच्यात झालेल्या १६९ धावांच्या भागीदारीने सामन्याचे चित्र बदलले. या सामन्यात पुन्हा एकदा दिलशान मधुशंकाने श्रीलंकेसाठी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर महिश तिक्षाना आणि अँजेलो मॅथ्यूज यांना प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

या सामन्यातील बांगलादेशच्या विजयाने उपांत्य फेरीची समीकरणे फारशी बदललेली नाहीत. पण अधिकृतपणे श्रीलंकेचा संघ आता या शर्यतीतून बाहेर पडला आहे. याशिवाय गुणतालिकेत आता बांगलादेश ४ गुणांसह सातव्या स्थानावर आला असून श्रीलंकेचेही ४ गुण झाले असले, तरी संघ आठव्या स्थानावर घसरला आहे. आता बांगलादेश आणि इंग्लंडसोबतच श्रीलंकेचेही नाव बाहेर पडणाऱ्या संघांमध्ये आले आहे. दुसरीकडे भारत आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. म्हणजेच आता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेदरलँड हे संघ शेवटच्या दोन स्थानांसाठी लढताना दिसणार आहेत.