भारतीय खेळाडूंनी येथील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या संचलनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ध्वजानिशी भाग घेतला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनवर बंदी घातली असल्यामुळे भारताच्या राष्ट्रध्वजानिशी हे खेळाडू सहभागी होऊ शकले नाहीत. शिवा केशवन, हिमांशु ठाकूर व नदीम इक्बाल यांना आयओसीच्या ध्वजाखाली उद्घाटन समारंभातील संचलनात भाग घ्यावा लागला. हे खेळाडू वैयक्तिक प्रवेशिकेद्वारे सहभागी झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा : भारतीय खेळाडू आयओसीच्या ध्वजानिशी संचलनात सहभागी
भारतीय खेळाडूंनी येथील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या संचलनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ध्वजानिशी भाग घेतला.
First published on: 08-02-2014 at 01:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sochi winter olympics 2014 indian athletes forced to march under ioc flag at opening ceremony