भारतीय टेबल टेनिसपटूंसाठी ऑलिम्पिक पदक हे खडतर आव्हान आहे. मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या टेबल टेनिसपटूंनी जागतिक क्रमवारीत आगेकूच केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सौम्यजित घोषने जागतिक क्रमवारीत ६१वे स्थान गाठले आहे. कारकीर्दीत सौम्यजीतचे हे क्रमवारीतले सर्वोत्तम स्थान आहे. सौम्यजितने चार स्थानांनी सुधारणा करत ६१व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. अनुभवी शरथ कमालने ७३वरून ६९वे स्थान पटकावले आहे. दिल्लीकर मनिका बात्राने १२८व्या स्थानावरून १३ स्थानांनी सुधारणा करत ११५वे स्थान मिळवले आहे. हे तिघेही रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये दमदार प्रदर्शनामुळेच त्यांनी क्रमवारीत ही वाटचाल केली आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली अनुभवी मौमा दास कोलकातामध्ये वैयक्तिक प्रशिक्षकासह सराव करत आहे. १५ जूनपासून टोक्यो येथे होणाऱ्या स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. मौमाने १५८व्या स्थानावरून १४५व्या स्थानी आगेकूच केली आहे.

कनिष्ठ गटाच्या क्रमवारीत अनंत देवराजन २४व्या तर मानव ठक्कर ५४व्या स्थानी आहेत. पहिल्यांदाच दोन भारतीय खेळाडूंनी क्रमवारीत स्थान पटकावले आहे. मुलींमध्ये अर्चना कामतने अव्वल २५मध्ये स्थान मिळवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soumyajit ghosh table tennis
First published on: 08-06-2016 at 05:36 IST