सौरव गांगुलीसारख्या क्रिकेटपटूसमोर आपल्या गोलंदाजीचे कौशल्य दाखवल्यानंतर कोणताही गोलंदाज प्रगती करू शकतो. पण असा एक भारतीय गोलंदाज आहे, जो आता आपले कुटुंब चालविण्यासाठी चहा विकत आहे. आसामकडून रणजी करंडक खेळलेला प्रकाश भगत आता आयुष्याच्या कठीण टप्प्यातून जात आहे.

२००९-१० मध्ये आसामकडून रणजी करंडक खेळणार्‍या प्रकाशने २००३मध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतले. त्यावेळी त्याने सौरव गांगुलीला गोलंदाजी केली. त्याच दरम्यान त्याला सचिन तेंडुलकर, झहीर खान, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग यांना भेटण्याची संधीही मिळाली.

 

वडिलांच्या मृत्यूनंतर सोडले क्रिकेट

२०११मध्ये वडिलांच्या निधनानंतर प्रकाशला क्रिकेट सोडावे लागले. वडील व मोठा भाऊ चाट विक्री करायचा आणि वडिलांच्या निधनानंतर मोठ्या भावाची तब्येतही खालावली. प्रकाश म्हणाला, ”करोना विषाणूमुळे त्यांच्या रोजच्या कामावरही परिणाम झाला. आता तो चहा विकत आहे.”

हेही वाचा – टोकियोला निघाला पुणेकर..! उदयन मानेला मिळालं ऑलिम्पिकचं तिकीट

”आमची उपजीविका नेहमीच कठीण होती, परंतु आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. चहाच्या दुकानातून जितके पैसे येतात, ते दोन वेळेच्या जेवणासाठीही कमी पडतात. माझ्या संघातील सहकाऱ्यांना सरकारी नोकर्‍या मिळाल्या आहेत, पण माझ्या कुटुंबाला दररोज त्रास होत आहे”, असेही प्रकाशने सांगितले.