मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या राही सरनोबत हिचा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राही सरनोबतने नुकत्याच झालेल्या एशियन गेम्समध्ये नेमबाजीतील २५ मीटर एअर पिस्तुल या प्रकारात सुवर्णवेध घेतला होता. या भेटीदरम्यान तावडे यांनी राहीला २०२०मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत अशीच सुवर्ण कामगिरी करून पदकाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असे सांगितले. त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, असेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. राहीनेदेखील आता पुढील लक्ष्य प्रामुख्याने टोकियोतील ऑलिम्पिक स्पर्धाच असल्याचे यावेळी नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports minister vinod tawde felicitated rahi sarnobat
First published on: 11-09-2018 at 01:05 IST