श्रीलंका क्रिकेट बोर्डाने निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंसाठी नवा नियम लागू केला आहे. खेळाडूंना आता निवृत्तीसाठी बोर्डाला तीन महिन्यांची नोटीस देतील. याशिवाय त्यांना NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा महिने वाट पाहावी लागेल. त्यानंतरच ते इतर देशांच्या टी-२० लीगमध्ये खेळू शकतील. याशिवाय लंका प्रीमियर लीग खेळण्यासाठी पात्र होण्यासाठी त्याला ८० टक्के देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल.

दानुष्का गुणथिलका आणि भानुका राजपक्षे यांच्या अचानक निवृत्तीनंतर हा बोर्डाने निर्णय घेण्यात आला आहे. भानुकाने आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला. गुणथिलकाने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. ईएसपीएनच्या रिपोर्टनुसार, इतर काही खेळाडू निवृत्तीची तयारी करत असल्याच्या अफवाही पसरत आहेत. अविष्का फर्नांडोनेही सोशल मीडियावर येऊन मीडियाच्या बातम्या बिनबुडाच्या असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, ”कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, मी कोणत्याही फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत नाही.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंना तीन महिने अगोदर निवृत्ती घेण्याच्या इराद्याबाबत बोर्डाला कळवावे लागेल, असे श्रीलंका क्रिकेटने जारी केले आहे. याशिवाय निवृत्तीला सहा महिने झाले असतील, तेव्हाच त्याला इतर देशांच्या टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी NOC मिळेल.

हेही वाचा – पाकिस्तानच्या शोएब मलिकचा नवा अवतार; पत्नी सानियासह मेहुणीनं केली ‘अशी’ कमेंट!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीलंका क्रिकेटमध्ये बराच गदारोळ उडाला आहे. वेतनकपात, नवी फिटनेस प्रक्रिया अशा अनेक स्तरांतून लंकेच्या क्रिकेटपटूंना जावे लागत आहे. काही खेळाडूंनी श्रीलंका क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर काही खेळाडू अमेरिकेत खेळण्यासाठी देश सोडून गेले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन मंडळाने नवे आणि कडक नियम तयार केले आहेत.