कराची : दिनेश चंडिमलने (७८) झळकावलेल्या दमदार अर्धशतकाला दिलरुवान परेरा (४८) आणि धनंजय डीसिल्व्हा (३२) यांच्या फलंदाजीची उत्तम साथ लाभल्यामुळे श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ८० धावांची आघाडी घेतली. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील १९१ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने २७१ धावा केल्या. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने ७७ धावांत ५ बळी घेतले. मोहम्मद अब्बासने ५५ धावांत ४ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानने दुसऱ्या डावात बिनबाद ५७ धावा केल्या असून अबिद अली ३२, तर शान मसूद २१ धावांवर खेळत आहे. पाकिस्तान अद्यापही २३ धावांनी पिछाडीवर आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2019 रोजी प्रकाशित
पाकिस्तान-श्रीलंका कसोटी मालिका : श्रीलंकेला पहिल्या डावात आघाडी
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने ७७ धावांत ५ बळी घेतले
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 21-12-2019 at 00:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka take lead on day 2 of second test against pakistan zws