तेलंगणला होणाऱ्या कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेकरिता राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पध्रेद्वारे संघ निवडणे कठीण झाल्यामुळे मैदानी निवड चाचणी प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगण येथे २२ ते २५ मार्च या कालावधीत कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. परंतु सध्या करोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जळगावला ५ ते ८ मार्च यादरम्यान कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणे कठीण आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत ही स्पर्धा न घेता मैदानी निवड चाचणी घेण्याचे गुरुवारी झालेल्या कार्यकारणी मंडळाच्या ऑनलाइन सभेत ठरवण्यात आले. सर्व संलग्न जिल्हा संघटनेच्या निवडक कुमार व कुमारी खेळाडूंना या मैदानी निवड चाचणीकरिता पाचारण करून त्यातून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State kumar kumari kabaddi team through field selection test abn
First published on: 26-02-2021 at 00:02 IST