दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी एका कसोटी सामन्याच्या निलंबनाची शिक्षा भोगणाऱ्या स्टिव्ह स्मिथसाठी, माजी कर्णधार मायकल क्लार्क धावून आला आहे. घडलेला प्रकार लवकरात लवकर विसरुन ऑस्ट्रेलियाच्या संघाने पुढचा विचार करायला हवा असं मत क्लार्क याने व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – बॉल टॅम्परिंग : कर्णधार म्हणून मायकल क्लार्कचं पुनरागमन ?

“दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात जो काही प्रकार समोर आला आहे तो पाहता, स्मिथ या प्रकरणी १०० टक्के चुकलेला आहे. या वर्तनामुळे स्मिथ आणि बेनक्रॉफ्ट येत्या काळाच चांगलेच अडचणीत येऊ शकतात. घडलेला प्रकार पाहता दोषींवर कारवाई होणं गरजेचच आहे. मात्र प्रसारमाध्यम आणि चाहत्यांनी स्मिथला माफही करायला हवं. मला स्मिथबद्दल सहानुभूती वाटत आहे.” ऑस्ट्रेलियातील स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना मायकल क्लार्कने आपली भूमिका स्पष्ट केली.

अवश्य वाचा – बॉल टॅम्परिंग प्रकरण: हरभजन सिंहचा आयसीसीवर पक्षपातीपणाचा ठपका

चेंडुशी छेडछाड प्रकरणात आयसीसीने स्मिथवर एका कसोटी सामन्याच्या निलंबनाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमं, क्रीडा रसिक यांनी ऑस्ट्रेलियन संघावर टीकेची झोड उठवली आहे. मात्र मायकल क्लार्कने ऑस्ट्रेलियन चाहत्यांना आपल्या संघाच्या पाठीमागे भक्कम उभं राहण्याचं आवाहन करत, यापुढे असा प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचा सल्लाही आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे.

अवश्य वाचा – बॉल टॅम्परिंग : स्टिव्ह स्मीथ आणि डेव्हिड वॉर्नरवर आजीवन बंदी ?