*  अतितकरचे द्विशतक
*  हुकले  केदार जाधवचे शतक
रविवारी शतक झळकावणाऱ्या संग्राम अतितकरचे द्विशतक सोमवारी फक्त दहा धावांनी हुकले. त्याने २४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १९० धावा केल्या, तर केदार जाधवने १३८ चेंडूंत १७ चौकार आणि एका षटाकाराच्या मदतीने १०९ धावा फटकावल्यामुळे महाराष्ट्राने पहिला डाव ५४० धावांवर घोषित केला. महाराष्ट्राने दमदार आघाडी घेत सामन्यावर पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या डावात हरयाणाची सुरुवात चांगली झाली नसून तिसऱ्या दिवसअखेर त्यांची २ बाद ७५ अशी अवस्था आहे.