पीटीआय, बेल्लारी : राष्ट्रीय उपकनिष्ठ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या गर्देला सर्वोत्तम उदयोन्मुख बॉक्सिंगपटूचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत आर्या आणि समीक्षा सोलंकी यांनी आपापल्या वजनी गटाच्या अंतिम फेरीत ५-० असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे.

पुण्याच्या आर्याने स्पर्धेच्या अंतिम दिवशी ३६ किलो वजनी गटात गोव्याच्या सगुण शिंदेचा, तर समीक्षाने ४० किलो गटात उत्तर प्रदेशच्या साधनाचा सहज पराभव केला. कुमारी गटात हरयाणाने स्पर्धेत सात सुवर्णपदक पटकावली. हरयाणासाठी पायलने (४६ किलो) तमिळनाडूच्या गुणा श्रीवर ५-० असा विजय मिळवला. याशिवाय लक्षूने (६३ किलो) अरुणाचल प्रदेशच्या नबाम अनियाविरुद्ध विजय मिळवला. या स्पर्धेत हरयाणाने सात सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण १० पदके मिळवत एकूण ६० गुणांसह पहिले स्थान पटकावले, तर पंजाब आणि महाराष्ट्र अनुक्रमे ३८ आणि २७ गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. स्पर्धेत मणिपूरच्या जयश्री देवी आणि सेनादलच्या आकाश बधवारला सर्वोत्तम बॉक्सिंगपटू पुरस्कार मिळाला.

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
West Indies all rounder Sunil Narine confirmed on international retirement
आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर नरेन ठाम! ट्वेन्टी२० विश्वचषकात विंडीजसाठी खेळण्यास नकारच
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल

कुमार विभागात सेनादलाच्या बॉक्सिंगपटूंनी ७३ गुणांसह सांघिक विजेतेपद मिळविले. त्यांनी नऊ सुवर्ण आणि एक कांस्य अशी एकूण १० पदके जिंकली, तर हरियाणा आणि उत्तर प्रदेशने अनुक्रमे ५८ आणि २४ गुण मिळवून दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. हरयाणाने पाच सुवर्ण आणि तीन रौप्यपदके जिंकली, तर उत्तर प्रदेशने तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह आपल्या मोहिमेचा शेवट केला. ४६ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात छत्तीसगडच्या गिरवान सिंगचा पराभव करणाऱ्या हरयाणाच्या महेशला सर्वोत्तम उदयोन्मुख बॉक्सिंगपटू म्हणून गौरवण्यात आले, तर झारखंडच्या अनिश कुमार सिन्हाला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्तम आव्हानवीराचा पुरस्कार मिळाला.