W India vs W England 1st Test: नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात हरमनप्रीत बाबत एक घटना घडली ज्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांना ११ महिन्यांपूर्वीची घटना आठवली. टी-२० विश्वचषकात हरमन ज्या निष्काळजीपणाने आणि विचित्र पद्धतीने धावबाद झाली त्याचीच पुनरावृत्ती आज इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही झाली. तिचे अर्धशतक एका धावेने हुकले.

हरमनप्रीत कशी धावबाद झाली?

वास्तविक, कसोटी सामन्यादरम्यान हरमनप्रीतने चार्ली डीनच्या गोलंदाजीवर पॉइंटमध्ये एक धाव घेण्यासाठी फटका मारला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीतरी विचार करून ती पुन्हा मागे परतली. धाव घेणे शक्य नाही असे तिला वाटले. हरमनप्रीत ज्या दिशेने मागे वळली त्या दिशेने इंग्लंडची क्षेत्ररक्षक डॅनिएल व्याटने थेट स्टंपवर थ्रो केला. इंग्लिश संघाने अपील केल्यावर मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवला. सुरुवातीला भारतीय कर्णधार सुरक्षित असल्याचे दिसत होते. तिला स्वतःला आत्मविश्वास वाटत होता की, ती नाबाद आहे. मात्र, रिप्ले दाखवल्यावर त्यात ती बाद झालेली दिसत होती. ती क्रीझपर्यंत पोहोचली होती, पण बॅट लाइनच्या आत ठेवण्याऐवजी ती बाहेरच राहिली. तिला वाटले की, तिची बॅट क्रीझ लाइनच्या आत आहे. पंचांनी तिला धावबाद घोषित केले. हरमनने ८१ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ४९ धावांची खेळी केली. ती बाद होताच तिच्या आणि यास्तिका भाटिया यांच्यातील ११६ धावांची भागीदारीही तुटली.

Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य

टी-२० वर्ल्ड कपमध्ये काय घडलं?

या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीत अशाच पद्धतीने बाद झाली होती. खरे तर, त्या सामन्यात भारताच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सच्या मोबदल्यात १७२ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला एकवेळ २८ धावांवर तीन गडी गमावून संघर्ष करावा लागला होता, परंतु हरमनप्रीत कौर (३४ धावांत ५२ धावा) आणि जेमिमाह रॉड्रिग्स (२४ धावांत ४३ धावा) यांनी शानदार फलंदाजी करत भारताला सामना जिंकून देईल असे वाटत होते. जेमिमा आणि हरमनप्रीतमध्ये ४१ चेंडूत ६९ धावांची भागीदारी झाली होती.

भारतीय संघ जिंकलेला सामना हरला होता

भारताला शेवटच्या ३० चेंडूत ३९ धावा हव्या होत्या आणि पाच विकेट शिल्लक होत्या. अशा स्थितीत भारताला विजय सोपा वाटत होता. मात्र, नेहमीप्रमाणे टीम इंडियाला महत्त्वाच्या वळणावर सामना संपवता आला नाही आणि पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाला आठ विकेट्सवर केवळ १६७ धावा करता आल्या. भारतीय डावाच्या १५व्या षटकात दुसरी धाव घेण्यासाठी परतत असताना हरमनप्रीतची बॅट जमिनीत अडकली आणि अ‍ॅलिसा हिलीने पटकन बेल्स विखुरले आणि तिला बाद केले. हरमनप्रीतचा धावबाद हा सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. सामन्यातील लय विरुद्ध हरमन धावबाद झाल्यानंतर भारतीय महिला संघ दडपणाखाली आला आणि शेवटी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा: AUS vs PAK: ऑफस्पिनर आर. अश्विनसाठी नॅथन लायनने दिला खास संदेश, जाणून घ्या तो काय म्हणाला?

भारत-इंग्लंड कसोटीत काय झाले?

स्मृती मानधना १२ चेंडूत १७ धावा करून बाद झाली. त्याला बेलने बोल्ड केले. यानंतर भारताला ४७ धावांवर दुसरा धक्का बसला. शफाली वर्माला केट क्रॉसने बोल्ड केले. तिला ३० चेंडूत १९ धावा करता आल्या. भारताने ४७ धावांत दोन विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर नवोदित शुभा सतीश आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली.

शुभा ६९ धावा करून बाद झाली. तर, जेमिमा ६८ धावा करून बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने यास्तिका भाटियासह पाचव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. हरमनचे अर्धशतक हुकले. ८१ चेंडूत ४९ धावा करून ती पॅव्हेलियनमध्ये परतली. यास्तिका ६६ धावा करून बाद झाला. स्नेह राणा ३० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.