इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी तीन विश्वविजेते खेळाडू आणि सुंदरम रवी या एकमेव भारतीय पंचाचा २२ जणांच्या सामनाधिकाऱ्यांच्या चमूत समावेश करण्यात आला आहे.
४८ दिवसांच्या विश्वचषकासाठी एकूण १६ पंच, सहा सामनाधिकारी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) निवड केली आहे. यात डेव्हिड बून, ब्रुस ऑक्सनफोर्ड, कुमार धर्मसेना, आलीम दर यांचा समावेश आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी पंच व सामनाधिकाऱ्यांची नेमणूक राऊंड रॉबिन टप्प्यांचे सामने संपल्यानंतर जाहीर केली जाईल.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.