* कोलकातावर ५ विकेट्सनी विजय
* प्लेऑफमध्ये राजस्थानशी टक्कर
प्ले ऑफमधील चौथ्या संघासाठी सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मुकाबला होता. शनिवारी रात्री पावसाने बाधित लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बलाढय़ चेन्नईवर मात केली. या विजयानंतरही सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धची लढत गमावल्यासच बंगळुरूचा प्लेऑफचा मार्ग मोकळा होणार होता. मात्र घरच्या मैदानावर शेर असणाऱ्या हैदराबादने गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सवर मात करत प्ले ऑफमध्ये दिमाखात धडक मारली.
१३१ या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन आणि पार्थिव पटेल यांनी ८९ धावांची सलामी देत हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. धवनने ७ चौकारांसह ३७ चेंडूत ४७ धावा केल्या. पार्थिवने ३ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावांची खेळी केली. बिनबाद ८९ वरुन हैदराबादची ५ बाद ११२ अशी घसरगुंडी उडाली. मात्र डॅरेन सॅमीने लागोपाठ २ षटकार खेचत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रथम फलंदाजी करण्याचा कोलकाताचा निर्णय फसला. कॅलिस स्थिरावलाय असे वाटत असतानाच डेल स्टेनने त्याला बाद केले. त्याने २४ धावा केल्या. एका बाजूने सातत्याने विकेट्स पडत असताना युसुफ पठाणने एकाकी झुंज दिली. पठाणने २९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४९ धावांची खेळी केली. युसफच्या खेळीमुळेच कोलकात्याला १३० धावांची मजल मारता आली. हैदराबादतर्फे डेल स्टेनने सर्वाधिक २ बळी टिपले.
आयपीएल वेळापत्रक
* २१ मे  : क्वालिफायर १
सामना : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
ठिकाण : फिरोझ शाह कोटला, दिल्ली
* २२ मे : एलिमिनेटर
सामना : राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद
ठिकाण : फिरोझ शाह कोटला, दिल्ली
* २४ मे : क्वालिफायर २
सामना : एलिमिनेटर  विजेता संघ विरुद्ध क्वालिफायर १ मधील पराभूत संघ
ठिकाण : इडन गार्डन्स, कोलकाता
* २६ मे : अंतिम सामना.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunrisers hyderabad haughtinessly entered in playoff
First published on: 20-05-2013 at 02:21 IST