कोलकात्याचा ग्रँडमास्टर सूर्यशेखर गांगुली हा महाराष्ट्र बुद्धिबळ प्रीमिअर लीगमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. २४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी गांगुली याच्याकरिता एक लाख १५ हजार रुपयांची बोली लावून ठाणे कॉर्बेटंट्सने त्याला खरेदी केले.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व पुणे जिल्हा चेस सर्कल यांच्यातर्फे होणाऱ्या या स्पर्धेत गांगुली याच्याखालोखाल नाशिकचा उदयोन्मुख ग्रँडमास्टर विदित गुजराथी याला ९५ हजार रुपयांचा भाव मिळाला. त्याला जळगाव बॅटलर्सने खरेदी केले. महिलांमध्ये सर्वाधिक महागडी खेळाडूचा मान तानिया सचदेव हिला मिळाला. दिल्लीच्या या खेळाडूला जळगाव संघाने ५७ हजार रुपयांचे मानधन देत खरेदी केले. खेळाडूंच्या लिलावाबरोबरच स्पर्धेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष नितीन करीर यांच्या हस्ते झाले.
मुंबई मूव्हर्स
एस.अरुण प्रसाद, आर.आर.लक्ष्मण, किरण मनीषा मोहंती, कृत्तिका नाडिग, अश्विन जयराम. नुप देशमुख, राकेश कुलकर्णी, शशिकांत कुतवळ.
अहमदनगर चेकर्स
जी.एन.गोपाळ, एम.व्यंकटेश, तानिया सचदेव, शार्दूल गागरे, सागर शहा, मिथिल आजगांवकर, ऋचा पुजारी.
नागपूर रॉयल्स
तेजस बाक्रे, सहज ग्रोव्हर, सौम्या स्वामीनाथन, स्वप्नील धोपाडे, चिन्मय कुलकर्णी, श्वेता गोळे, अभिषेक केळकर.
जळगाव बॅटलर्स
विदित गुजराथी, ईशा करवडे, नारायणन श्रीनाथ, प्रतीक पाटील, एस.मीनाक्षी, समीर कठमाळे.
पुणे अ‍ॅटॅकर्स
एम.आर.ललितबाबू, पद्मिनी राऊत, स्वाती घाटे, अक्षयराज कोरे, हिमांशु शर्मा, अमरदीप बारटक्के.
ठाणे कॉर्बेटंट्स
सूर्यशेखर गांगुली, मेरी अ‍ॅन गोम्स, एस.विजयालक्ष्मी, आदित्य उदेशी, प्रथमेश मोकल, अभिमन्यू पुराणिक, पर्णाली धारिया.