scorecardresearch

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : ऋतिका श्रीरामला दुसरे सुवर्ण

यापूर्वी तीन मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारातही ऋतिका सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : ऋतिका श्रीरामला दुसरे सुवर्ण
महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने डायव्हिंग प्रकारात सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.

अहमदाबाद : विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने डायव्हिंग प्रकारात सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचबरोबर अर्जुन कढे-ऋतुजा भोसले जोडीने टेनिसच्या मिश्र दुहेरीत सोनेरी यश मिळविले. डायव्हिंगमध्ये ऋतिका श्रीरामने स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक मिळविले. हायबोर्ड प्रकारात ऋतिकाने ही सोनेरी कामगिरी केली.

यापूर्वी तीन मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारातही ऋतिका सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती.  टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत अर्जुन कढे-ऋतुजा भोसले या महाराष्ट्राच्या जोडीला सुवर्णपदक मिळाले. प्रतिस्पर्धी शर्मदा बालू-प्रज्ज्वल देव जोडीने पहिल्या सेटमध्ये १-१ अशा बरोबरी असताना माघार घेतली. शर्मदा पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकत नव्हती. पुरुष एकेरीच्या लढतीत अर्जुन कढेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत मनिष कुमारने पहिला सेट गमाविल्यावरही अर्जुनचा १-६, ६-१, ६-३ असा पराभव केला

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या