या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली आहे.

तिसऱ्या मानांकित श्रीकांतने ३६ मिनिटे चाललेल्या सामन्यात रशियाच्या व्लादिमिर माल्कोव्हचा २१-१२, २१-११ असा सरळ गेममध्ये पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्याची पारुपल्ली कश्यपशी गाठ पडणार आहे. कश्यपला फ्रान्सच्या लुकास कॉर्वीविरुद्धच्या लढतीत पुढे चाल मिळाली.

चौथ्या मानांकित साईप्रणीतने मलेशियाच्या इस्कांदर झुल्करनैनचा २१-१६, २२-२० असा पराभव केला, तर बिगरमानांकित प्रणॉयने चीनच्या लि शिया फेंगचा संघर्षपूर्ण लढतीत १८-२१, २२-२०, २१-१३ असा पाडाव केला.

गेल्या आठवडय़ात स्कॉटिश खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकणाऱ्या १८ वर्षीय लक्ष्यलाही पुढे चाल मिळाली. त्याचा प्रतिस्पर्धी फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलने स्पध्रेतून माघार घेतली. महिलांमध्ये अश्मिता छलिहाने वृषाली गुम्माडीचा ३२ मिनिटांत २१-१६, २१-१६ असा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syed modi badminton tournament akp 94
First published on: 28-11-2019 at 02:59 IST