सिम्बायोसिस क्रीडा केंद्रातर्फे दिला जाणारा ‘सिम्बायोसिस क्रीडा भूषण’ पुरस्कार यंदा पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांना देण्यात येणार आहे.सिम्बायोसिस क्रीडा केंद्राचे मानद संचालक डॉ.सतीश ठिगळे यांनी ही माहिती दिली. २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. देशपांडे यांनी मोटारस्पोर्ट्समध्ये अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपदे मिळविली आहेत. पूना ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी काम करताना देशपांडे यांनी भारतास जागतिक मोटोक्रॉस अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळवून दिला होता. पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी पुण्यात राज्य स्तरावर बॅडमिंटन लीग आयोजित करण्याच्या उपक्रमास सुरुवात केली. या लीगला मिळालेला नावलौकिक लक्षात घेऊनच भारतीय बॅडमिंटन महासंघाने इंडियन बॅडमिंटन लीग सुरु करण्याचे ठरविले आहे.