T20 WC: पाकिस्ताननं दाखवली खिलाडूवृत्ती; विरोधी संघाचा फलंदाज तंबूत परतला असताना…

या गोष्टीमुळं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचं होतंय कौतुक

t20 wc babar azam shows sportsmanship in warm up match against west indies
पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज सराव सामना

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सराव सामन्यात पाकिस्तानने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने तंबूत परतलेल्या शिमरॉन हेटमायरला फलंदाजीसाठी परत बोलावले. अंपायरने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, पण बाबरने त्याला जीवदान दिले.

दुबईच्या आयसीसी क्रिकेट अकादमी मैदानावर हा सामना रंगत आहे. सराव सामन्याच्या पंधराव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही घटना घडली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली षटक टाकत होता. हेटमायरने शॉर्ट बॉल चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू कीपर रिझवानकडे गेला आणि अपीलवर पंचांनी हेटमायरला बाद केले.

हेही वाचा – T20 WC : …म्हणून पत्रकार परिषदेत अचानक गप्प बसला बांगलादेशचा कप्तान; पाहा VIDEO

चेंडू बॅटला लागला नसल्याचे हेटमायरचे म्हणणे होते. रिव्यूच्या अभावामुळे त्याने मैदान सोडले. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने त्याला परत बोलावले. हा सराव सामना असला तरी प्रत्येकजण बाबर आझमच्या वर्तनाचे कौतुक करत आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc babar azam shows sportsmanship in warm up match against west indies adn

ताज्या बातम्या