T20 WC Eng VS Ban: इंग्लंडचा बांगलादेशवर ८ गडी राखून विजय; बांगलादेशची स्पर्धेतील वाट बिकट

इंग्लंडने बांगलादेशवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे..

England_Team1
इंग्लंडने बांगलादेशवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे.

इंग्लंडने बांगलादेशवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. इंग्लंडचा सुपर १२ फेरीतील सलग दुसरा विजय आहे. या विजयामुळे उपांत्य फेरीतील आशा वाढल्या आहेत. तर बांगलादेशचा पुढचा प्रवास बिकट झाला आहे. बांगलादेशनं इंग्लंडसमोर विजयासाठी १२५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशनं २० षटकात ९ गडी गमवून १२४ धावा केल्या होत्या. हे आव्हान इंग्लंडनं १५ षटकात दोन गडी गमवून पूर्ण केलं.

इंग्लंडचा डाव
इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉस बटलर जोडीने चांगली सुरुवात केली. मात्र संघाच्या ३९ धावा असताना जोस बटलरच्या रुपाने इंग्लंडला पहिला धक्का बसला. त्यानंतर जेसन रॉयला डेविड मलानची साथ मिळाली. दुसऱ्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी खेळी केली. जेसन रॉय ३८ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. त्याने या खेळात ५ चौकार आणि ३ षटकार मारले. तिथपर्यंत विजय दृष्टीक्षेपात आला होता.

बांगलादेशचा डाव
बांगलादेशने पहिल्या १० षटकात ३ गडी गमवून धावा केल्या आहेत. बांगलादेशला तिसऱ्या षटकात दोन धक्के बसले. मोइन अलीच्या सलग दोन चेंडूंवर दोन गडी बाद झाले. लिटन दास आणि मोहम्मद नइम बाद झाल्याने संघावर दडपण आलं. लिटनने ८ चेंडूत ९ तर मोहम्मद नइमने ७ चेंडूत ५ धावा केल्या. यानंतर मैदानात आलेला शाकिब अल हसनही तग धरू शकला नाही. ख्रिस व्होक्सच्या गोलंदाजीवर अदिल राशीदने त्याचा झेल घेतला. संघाची अवस्था बिकट असताना मुशफिकुर आणि महमुद्दुल्लाह यांनी डाव सावरला. मात्र दोघांना मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आलं. मुशफिकुर रहिम २९ धावांवर असताना लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानतर लगेचच होसैन ५ धावा करून तंबूत परतला. महमुद्दुल्ला १९, नुरुल हसन १६, महेदी हसन ११, मुस्तफिझुर रहमान ० अशी धावसंख्या करून बाद झाले.

दोन्ही संघाचे खेळाडू

इंग्लंडचा संघ- जेसन रॉय, जॉस बटलर, डेविड मालान, जॉनी बेअरस्टो, लियाम लिविंगस्टोन, इओन मॉर्गन, मोइन अली, ख्रिस व्होक्स, ख्रिस जॉर्डन, अदिल राशीद, टायमल मिल्स

बांगलादेशचा संघ- मोहम्मद नईम, लिटॉन दास, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, महमुद्दुल्लाह, अफिफ होसैन, नुरूल हसन, महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc england vs bangladesh match update rmt

ताज्या बातम्या