scorecardresearch

Premium

T20 WC Final: आधी कप्तानपद घेतलं काढून आणि नंतर बसवलं संघाबाहेर..! वॉर्नरनं ‘असा’ घेतला बदला

टी-२० विश्वचषक स्पर्धेत वॉर्नरला ‘हा’ किताब मिळाला.

T20 WC final david warner removed from srh captaincy kane Williamson got responsibility
डेव्हिड वॉर्नर आधी आणि आता…

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. या सामन्यात त्याने ५३ धावा करत संघाच्या विश्वविजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १८.८ षटकांत २ गडी राखून लक्ष्य गाठले. वॉर्नरशिवाय मिचेल मार्शनेही नाबाद ७७ धावा केल्या. आयपीएल २०२१ मध्ये, सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरकडून कप्तानद काढून घेतले आणि केन विल्यमसनला संघाचा कर्णधार बनवले. एवढेच नव्हे, तर अंतिम सामन्यांमध्ये वॉर्नरला प्लेइंग-११ मधूनही वगळण्यात आले होते. पण वॉर्नरने टी-२० विश्वचषकातील आपल्या कामगिरीने सर्व विरोधकांना उत्तर दिले आहे.

डेव्हिड वॉर्नरला मालिकावीराचाही किताब मिळाला. त्याने ७ डावात ४८ च्या सरासरीने २८९ धावा केल्या. तसेच ३ अर्धशतके ठोकली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४७ होता. वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ८९ धावांची त्याची सर्वात मोठी खेळी खेळली. टी-२० विश्वचषकाच्या शेवटच्या तीन डावात वॉर्नरने अनुक्रमे ८९*, ४९ आणि ५३ धावा केल्या. म्हणजेच संघाच्या गरजेच्या वेळी त्याने स्वतःला सिद्ध केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या स्पर्धेत सर्वाधिक ३०३ धावा केल्या. वॉर्नर दुसऱ्या स्थानावर राहिला.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

फोटोगॅलरी – T20 WC : ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणारा क्रिकेटपटू होणार भारताचा ‘जावई’; लवकरच करणार लग्न!

डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विदेशी फलंदाज आहे. त्याचा एकूण टी-२० रेकॉर्डही चांगला आहे. त्याने ३१२ सामन्यांमध्ये १०२५५ धावा केल्या आहेत. त्याने ८ शतके आणि ८४ अर्धशतके केली आहेत. त्‍याने टी-20 आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये एक शतक आणि २० अर्धशतके झळकावली आहेत.

डेव्हिड वॉर्नरने आधीच आयपीएल लिलावात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याला लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन आयपीएल संघांचा कर्णधार बनवले जाऊ शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-11-2021 at 00:33 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×