T20 WC: ‘बाबर आझमला आता चिठ्ठ्या पाठवल्या जात नाहीत’; शोएब अख्तरने असं सांगताच हरभजन…

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं बाबर आझम बाबत मोठं विधान केलं आहे.

Shoiab_Akhtar_Harbhajan
T20 WC: 'बाबर आझमला आता चिठ्ठ्या पाठवल्या जात नाहीत'; शोएब अख्तरने असं सांगताच हरभजन…

टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. वर्ल्डकप सुपर १२ फेरीतील सलग ५ सामने जिंकत पाकिस्ताननं उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. आज पाकिस्तान आणि भारत यांच्यात सामना होत आहे. पाकिस्तानचं पारडं या सामन्यात जड आहे. मात्र ऑस्ट्रेलियासोबतचा सामना वाटतो तितका सोपा नसेल, याची जाणीव पाकिस्तान संघाला आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं बाबर आझम बाबत मोठं विधान केलं आहे. एका शोदरम्यान हरभजन सिंग आणि शोएब अख्तर एकत्र आले होते. यावेळी शोएब अख्तरने आपलं मत मांडलं.

“जर आपण बाबरचं मागच्या एका वर्षातील कर्णधारपद पाहाल आणि या महिन्यातील कर्णधारपद पाहाल, तर बाबरला भूमिका बजावण्यास दिली आहे. आता त्याला चिठ्ठ्या पाठवल्या नाहीत. हे पण सांगितली नाही की, तू व्यक्त होऊ शकत नाही”, असं शोएब अख्तरने सांगितलं. शोएब अख्तरच्या या वक्तव्यानंतर हरभजन सिंगला हसू आवरलं नाही. तर शोएबही हसू लागला. दरम्यान शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सामन्यापूर्वी शुभेच्छाही दिल्या.

बाबर आझम सध्या चांगली कामगिरी करत आहे. वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत पाकिस्तानने पाचही सामने जिंकले आहेत. तसेच कर्णधार बाबर आझमने ५ सामन्यात २६४ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, सामन्यापूर्वी मोहम्मद रिझवान आणि शोएब मलिक या पाकिस्तानच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या खेळण्याबाबत शंका होती. मात्र, आता हे दोन्ही खेळाडू तंदुरुस्त झाले असून आज होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यासाठी ते उपलब्ध असल्याची बातमी समोर आली आहे. या दोन्ही खेळाडूंनी फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc shoaib akhtar statement on babar azam after harbhajan laugh rmt

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या