टी २० वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत एकूण तीन हॅटट्रीकची नोंद झाली आहे. आयर्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी हॅटट्रीक घेतली आहे. इंग्लंड विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात कगिसो रबाडाने तीन चेंडूत तीन गडी बाद केले. कगिसो रबाडाने शेवटच्या षटकात तीन गडी बाद केल्याने इंग्लंडला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी १४ धावांची आवश्यकता होती. तर ५ गडी हातात होते. तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने कगिसो रबाडाच्या हाती षटक सोपवलं. पहिल्या तीन चेंडूत तीन गडी बाद करत कगिसोने विजय सोपा केला आणि स्पर्धेतील तिसरी हॅटट्रीक घेतली.

आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात पहिली हॅटट्रीक घेतली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगा दुसरी हॅटट्रीक घेतली. त्यानंतर आता कगिसो रबाडाने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात तिसरी हॅटट्रीक घेतली.

  • पहिल्या चेंडूवर ख्रिस वोक्स बाद झाला
  • दुसऱ्या चेंडूवर इऑन मॉर्गन बाद झाला
  • तिसऱ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डन बाद झाला
  • चौथ्या चेंडूवर १ धाव आली
  • पाचव्या चेंडूवर १ धाव आली
  • सहाव्या चेंडूवर १ धाव आली

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला १० धावांनी पराभूत केलं. मात्र उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयश आलं आहे. इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी ८ गुण आहेत. मात्र धावगती कमी पडल्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत वर्णी लागली आहे. इंग्लंड ८ गुण आणि +२.४६४ धावगती, ऑस्ट्रेलिया ८ गुण +१.२१६ धावगतीसह उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेची ८ गुणांसह धावगती +०.७३९ इतकी असल्याने आव्हान संपुष्टात आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ- क्विंटन डिकॉक, रीझा हेन्ड्रिक, रस्सी वॅनदर दुस्सेन, एडन मारक्रम, टेम्बा बवुमा, डेविड मिलार, ड्वेन प्रेटोरिअस, कागिसो रबाडा, केशव महाराज, अनरिज नॉर्तजे, तबरेज शम्सी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडचा संघ- जेसन रॉय, जॉस बटलर, डेविड मालान, जॉनी बेअरस्टो, इऑन मॉर्गन, मोइन अली, लिआम लिविंगस्टोन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, अदिल राशीद, मार्क वूड