टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ आज उपांत्य फेरीत इंग्लंड संघाशी भिडणार आहे. या सामन्यातील विजेता संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील विजेत्या संघाचा सामना करणार आहे. दरम्यान, भारताविरोधातील सामन्याआधी इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलल याने प्रसारमाध्यमांशी बोलताना संघाची तयारी, डेव्हिड मलनला झालेली दुखापत आणि सूर्यकुमार यादव अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. भारत-पाकिस्तान सामना होऊ नये यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत असल्याचं बटलरने यावेळी म्हटलं आहे.

“आम्हाला भारत-पाकिस्तानमधे अंतिम सामना व्हावा अशी इच्छा नाही. त्यामुळे तो होऊ नये यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करु,” असं जोस बटरलने सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषेदत सांगितलं.

विश्लेषण: उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी भारतीय संघ कितपत सज्ज? आणखी काय आव्हाने?

जोस बटलरने यावेळी सूर्यकुमार यादवच्या खेळीवरही भाष्य केलं. “त्याला खेळताना पाहणं म्हणजं एक पर्वणी आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत तो सर्वोत्तम फलंदाज आहे. तो अत्यंत मोकळेपणाने क्रिकेट खेळतो हीच त्याची जमेची बाजू आहे. तो मैदानात कोणत्याही बाजूला फटके लगावू शकतो आणि तो त्याच पद्धतीने खेळतो. कोणत्याही फलंदाजाला बाद करण्यासाठी त्याने फक्त एक चूक करणं गरजेचं असतं आणि आम्ही ती संधी शोधण्याचा प्रयत्न करु,” असं बटरलने म्हटलं आहे.

युजवेंद्र चहलला एकाही सामन्यात संधी न देण्याबद्दल तो म्हणाला की “चहल एक उत्तम गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याच्यासह खेळताना मला मजा आली. तो एक चांगला गोलंदाज असून, विकेट्स घेण्यासाठी उत्सुक असतो. जर त्याला संधी दिली तर तो सोनं करेल याची मला खात्री आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुवनेश्वरच्या गोलंदाजीचा सामना करण्यासंबंधी विचारलं असता त्याने सांगितलं की “माझा माझ्या खेळावर विश्वास आहे. काही गोलंदाजांचा सामना करताना इतरांच्या तुलनेत थोडं अवघड जातं. त्यांच्याविरोधात खेळताना यश, अपयश येत असतं. पण मला कोणाची भीती वाटत नाही. मी नेहमीच तयारी करत असतो आणि मी चेंडूचा विचार करतो, गोलंदाजाचा नाही”.