T20 WC: पाकिस्तानच्या माजी महिला कर्णधाराचं विराट कोहलीबद्दल मोठं विधान; म्हणाली…

टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मोठा पराभव केला

T20 World Cup, Former Pakistan womens cricket team skipper Sana Mir, Virat Kohli, सना मीर, विराट कोहली
टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मोठा पराभव केला

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. संपूर्ण खेळभावनेने आपला पराभव स्वीकारणारा विराट कोहली आदर्श खेळाडू असल्याचं सना मीरने म्हटलं आहे. पाकिस्तानविरोधातील मानहानीकारक पराभवानंतर विराट कोहलीने मोहम्मद रिझवानची गळाभेट घेतली होती. तसंच बाबर आझमचंही अभिनंदन केलं होतं.

टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मोठा पराभव केला. यासोबत वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात विजयी न होण्याचा लाजिरवाणा विक्रमही पाकिस्तानने मोडीत काढला.

सना मीरने आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे की, “विराट कोहलीने पूर्ण खेळभावनेने आपला पराभव स्वीकारला आणि त्याच्या याच गोष्टीचं मी कौतुक करते. मोठ्या खेळाडूंनी अशा पद्धतीने वर्तन करणं वास्तवात फार चांगलं आहे”. विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही विराट कोहलीचा फोटो शेअर करत खेळभावनेचं कौतुक केलं होतं.

सना मीरने पुढे म्हटलं आहे की, “यामुळे त्यांच्यात असणाऱ्या सुरक्षा भावनेचीही जाणीव होते. याचा अर्थ पुनरागमन करण्यासंबंधी त्यांना विश्वास आहे”. भारताने एखादा मोठा विजय मिळवत पुनरामन केलं तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही असंही तिने म्हटलं आहे. “जर भारताने मोठ्या विजयासोबत पुनरागमन केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि मला आशा आहे की स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांविरोधात मैदानात खेळताना दिसतील,” असं तिने म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup former pakistan womens cricket team skipper sana mir on virat kohli sgy

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या