T20 WC: आशियाई खेळपट्ट्यांवर धोकादायक असणारा भारतीय संघ टी-२० मधील सर्वात…; इंझमामने केली भविष्यवाणी

भारताने दुसऱ्या सराव सामन्यातही मिळवलेल्या विजयानंतर इंझमामने हे वक्तव्य केलं आहे

T 20 World Cup, T20 World Cup, Inzamam ul Haq, टी २० वर्ल्ड कप, ट्वेंटी २० वर्ल्ड कप
भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचं पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने म्हटलं आहे

भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचं पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने म्हटलं आहे. भारताने दुसऱ्या सराव सामन्यातही मिळवलेल्या विजयानंतर इंझमामन हे वक्तव्य केलं आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सराव सामन्यातही भारताने सहजपणे ऑस्ट्रेलियावर मात केली. आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना इंझमामने भारतीय खेळाडूंना साजेशी परिस्थिती असल्याने या स्पर्धेत सर्वात धोकादायक संघ ठरु शकतो असं म्हटलं आहे.

“आशियाई खेळपट्ट्यांवर भारतीय संघ टी-२० मधील सर्वात धोकादायक संघ असून त्यांना नमवणं अशक्य आहे. जर तुम्ही ऑस्ट्रेलियाविरोधात सामना पाहिलात तर त्यांनी अत्यंत सहजपणे १५५ धावा करत विजय मिळवला. विराट कोहलीने तर फलंदाजीही नाही केली. ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरोधात त्यांना कोणतीही अडचण जाणवली नाही,” असं सांगत इंझमामने कौतुक केलं आहे.

“स्पर्धेदरम्यान एखादा संघ जिंकेल असं तुम्ही कधीच सांगू शकत नाही. हा संधींचा भाग आहे. मापण माझ्या मते अमिराती येथील सध्याच्या स्थितीत भारतीय संघ जेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहे,” असं इंझमामने म्हटलं आहे.

“त्यांना टी-२० क्रिकेटचा खूप अनुभव आहे. त्यांचे फक्त फलंदाजच नाही, तर गोलंदाजदेखील अनुभवी आहेत,” असं सांगताना इंझमामने स्पर्धेत फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका निभावतील असं म्हटलं आहे.

“अमिरातीमध्ये मी अनेक सामने खेळले असून इथे बॉल खूप फिरतो. त्यांच्याकडे अश्विन आणि जाडेजा असे दोन फिरकी गोलंदाज आहेत. याशिवाय ते स्वत: फिरकी गोलंदाजांविरोधात चांगलं खेळतात. ही त्यांच्या जमेची बाजू आहे,” असं इंझमामने म्हटलं आहे.

इंझमामने यावेळी भारत-पाकिस्तान सामन्यावरही भाष्य केलं. पाकिस्तानला संघाला धक्का बसणार नाही असं इंझमामने म्हटलं आहे. “भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान २४ ऑक्टोबरला होणारा सामना हा फायनआधी होणारी फायनल आहे. या सामन्यामुळे प्रचंड चर्चा असून इतकं इथर दुसऱ्या कोणत्या सामन्याबद्दल नसेल. पाकिस्तान संघ टी-२० सहित सर्व प्रकारात उत्तम आहे. त्यामुळे हा एक पाहण्याजोगा सामना असेल,” असं इंझमामने सांगितलं आहे,

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup inzamam ul haq says indias chances of winning higher than others sgy

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या