विकआंझे (हॉलंड) : विश्वविजेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने आपल्या नावावर आणखी एक विश्वविक्रम नोंदवला. सर्वाधिक १११ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम कार्लसनने त्याच्या नावे केला आहे. याआधी हा विश्वविक्रम हॉलंडचे सर्जी टिव्हियाकोव यांच्या नावावर होता. जो १५ वर्षांपासून अबाधित होता. कार्लसन सध्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत सलग चौथ्या फेरीत कार्लसनने बरोबरी पत्करली. चौथ्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन वॅन फॉरेस्टविरुद्धचा डाव कार्लसनने बरोबरीत सोडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata steel chess championship another world record for carlson zws
First published on: 16-01-2020 at 03:45 IST