पीटीआय, कोलकाता

भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन ईरिगियासीने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत जलदगती (रॅपिड) प्रकाराच्या जेतेपदानंतर अतिजलद (ब्लिट्झ) प्रकारातही चमकदार कामगिरी करताना उपविजेतेपद मिळवले.

world athletics announces cash prizes for gold medallists in paris olympics
विश्लेषण: ॲथलेटिक्स सुवर्णपदकविजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये रोख पदके… हा निर्णय क्रांतिकारी कसा? मूळ नियम काय आहेत
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद

अर्जुनने शनिवारी अतिजलद प्रकारात नऊ फेऱ्यांअंती ६.५ गुणांसह अव्वल स्थान मिळवले. रविवारीही त्याने चांगला खेळ सुरू ठेवला. मात्र, त्याच्याप्रमाणेच जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या लेव्हॉन अरोनियननेही झुंजार खेळ केला. त्यामुळे एकूण १८ फेऱ्यांअंती अर्जुन आणि अरोनियन या दोघांचेही ११.५ असे समान गुण होते. ही बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी टायब्रेकर खेळवण्यात आला.

यात अर्जुनने आक्रमण केले, पण अरोनियनने तितकाच चांगला बचाव केल्याने पहिल्या गेमअंती बरोबरी कायम राहिली. त्यामुळे अरमागेदोन डाव खेळवण्यात आला. यामध्ये पांढऱ्या प्याद्यांसह खेळताना अरोनियनने विजय मिळवत टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या अतिजलद प्रकाराचे जेतेपद पटकावले. अधिबनने आरोग्याच्या कारणास्तव माघार घेतल्याने त्याच्या जागी अर्जुनला प्रवेश देण्यात आला आणि त्याने या संधीचे सोने केले. याआधी अर्जुनने अरोनियनलाच बरोबरीत रोखत जलदगती प्रकारात जेतेपद मिळवले.

अतिजलद प्रकारात भारताच्या  निहाल सरिनने ११ गुणांसह चौथा, तर डी. गुकेशने १० गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला. तसेच रौनक साधवानी (८ गुण), विदित गुजराथी (६.५ गुण) आणि द्रोणावल्ली हरिका (४ गुण) यांचा अव्वल दहामध्ये क्रमांक लागला.