Video of Indian players and fans singing Vande Mataram: सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गतविजेता भारत आणि कुवेत यांच्यात मंगळवारी रात्री खेळला गेला. यजमान भारताने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असा पराभव करत नवव्यांदा सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली. या विजयासह भारतीय संघाने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाने नेशन्स कप आणि इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकला आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर स्टेडियममध्ये जे दृश्य पाहायला मिळाले ते वर्षानुवर्षे चाहत्यांच्या स्मरणात राहील. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

चाहत्यांनी एकसुरात गायले वंदे मातरम –

भारत आणि कुवेत यांच्यातील रोमहर्षक अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे ३०,००० चाहत्यांनी बंगळुरू येथील कांतेरावा स्टेडियमवर गर्दी केली होती. सामना संपताच सुनील छेत्रीने चाहत्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. तेव्हाच संपूर्ण स्टेडियममध्ये वंदे मातरमचे गाणे गुंजू लागले. छेत्री आणि चाहते हे गाणे एकत्र गाताना दिसले. हळूहळू संपूर्ण टीम इंडिया चाहत्यांसोबत ‘माँ तुझे सलाम’ गाताना दिसली. सगळीकडे फक्त देशभक्ती दिसत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
Mumbai Indians Kieron Pollard and Tim David Fined 20 Percent Match Fees for Breaching IPL Code of Conduct
IPL 2024: पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर आयपीएलकडून कारवाई, मुंबई-पंजाबमधील लाईव्ह सामन्यातील ‘ही’ चूक पडली महागात
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल

सुनील छेत्रीने मानले चाहत्यांचे आभार –

सामना संपल्यानंतर सुनील छेत्रीने चाहत्यांचे आभार मानले. या उत्कंठावर्धक सामन्यात बंगळुरूचे स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होत. विजयानंतर छेत्रीने सांगितले की, हा सामना अजिबात सोपा नव्हता पण चाहत्यांनी चाहत्यांनी पाठिंबा देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. छेत्री बेंगळुरू एफसीकडूनही खेळतो.

हेही वाचा – LPL 2023: हजहून परतल्यानंतर बाबर आझमचं मोठं पाऊल, एलपीएलमध्ये ‘या’ कंपन्यांचे लोगो असलेली जर्सी न घालण्याचा निर्णय

भारताने नवव्यांदा सॅफ फुटबॉलचे विजेतेपद पटकावले –

गोलकीपर गुरप्रीत सिंग संधूने निर्णायक पेनल्टी वाचवण्यासाठी डायव्हिंग केले. त्यामुळे भारताने शूटआऊटमध्ये कुवेतचा ५-४ असा पराभव करून नवव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. १२० मिनिटांचा खेळ संपेपर्यंत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. पेनल्टी शूटआऊटच्या पाच फेऱ्यांनंतरही स्कोअर ४-४ होता, त्यानंतर महेश नोरेमने गोल केला. यानंतर भारताचा गोलरक्षक गुरप्रीत संधूने डायव्हिंग करत खालिद हाजियाचा फटका अडवला.

हेही वाचा – Kane Williamson: घरात मुलीसोबत क्रिकेट खेळताना दिसला केन विल्यमसन, VIDEO होतोय व्हायरल

अंतिम फेरीत कुवेतचा पराभव करून भारताने सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने नवव्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. भारत यापूर्वी १९९३, १९९७, १९९९, २००५, २००९, २०११, २०१५ आणि २०२१ मध्ये चॅम्पियन बनला होता. स्पर्धेच्या १४ वर्षांच्या इतिहासात, भारत नऊ वेळा चॅम्पियन म्हणून उदयास आला आहे आणि चार वेळा उपविजेता ठरला.